शेअर बाजार कोसळला, रुपयाची विक्रमी घसरण

शेअर बाजार कोसळला, रुपयाची विक्रमी घसरण

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. आजही डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण झाली. सलग चौथ्या दिवशी रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत ७३.६० रुपये झाली आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारातही हाहाकार माजला असून सेन्सेक्समध्ये ५८० अंकांनी घसरण झाली आहे. बुधवारी एका डॉलरची किंमत ७३.३ रुपये झाली होती. सोमवारी ४३ पैशांनी रुपया घसरला होता. सोमवारी एका डॉलरची किंमत ७२.९१ एवढी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रुपयाची घसरण होत आहे. त्याशिवाय एमर्जिंग इकॉनॉमिजसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचाही रुपयावर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 
शेअरबाजारहीकोसळला
बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये ५८० अंकांनी घसरण झाली. आज सकाळी बीएसई सेन्सेक्स ४७० अंकावर होता. त्यात १.३० टक्क्यांनी घसरण होऊन ३५,५२१.७३ वर आला. तर निफ्टी निर्देशांकातही १५० अंकांची घसरण पाह्यला मिळाली. सकाळी १०७५४ अंकावरून निफ्टीची सुरुवात झाली होती.