सलिल पारेख यांची इन्फोसिसच्या एमडी आणि सीईओ या पदांवर नियुक्ती

सलिल पारेख यांची इन्फोसिसच्या एमडी आणि सीईओ या पदांवर नियुक्ती

नवी दिल्ली: देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने सलिल एस, पारेख यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) या पदांवर नियुक्ती केली आहे. पुढील महिन्यात २ जानेवारीला पारेख आपला पदभार स्वीकारणार आहेत.पारेख यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नामनिर्देशन आणि वेतन समितीच्या शिफारशीनुसारच ही नियुक्ती केली गेल्याचे कंपनीने सांगितले आहे.पारेख सध्या फ्रेंच आयटी सर्व्हिसेस कंपनी 'कॅपजेमिनी' या कंपनीत ग्रुप कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी कॉर्नल विद्यापीठातून कंप्यूटर सायन्स आणि मॅकॅनिकल इंजीनिअरिंगची मास्टरची पदवी प्राप्त केली आहे. याबरोबरच त्यांनी आयआयटी मुंबईची अॅरोनॉटिकल इंजीनिअरिंगमधून बीटेकही केले आहे.नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणूनच काम पाहणार आहेत. तर, कंपनीचे शेवटचे सीईओ प्रवीण राव यांची मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (सीओओ) या पदावर नियुक्ती केली जाणार आहे.