सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्याचा टक्का वाढला

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्याचा टक्का वाढला

नवी दिल्ली : देशभरातील ४९ लाख सरकारी आणि निवृत्तीवेतनधाराकांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने आज एका टक्क्याने महागाईभत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ निवृत्ती वेतानाधाराकानंही होणार आहे. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबतच्या ग्रॅज्युइटीची मर्यादासंदार्भातील विधेयकाला बैठकीदरम्यान मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘ पेमेंट ऑफ ग्रॅज्युइटी अॅक्ट - १९७२ ’ या कायद्यात बदल करून सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी मर्यादा मिळवून देण्याच्या विचाराधीन आहे.