१०० वर्षांची झाली एक रुपयाची नोट

१०० वर्षांची झाली एक रुपयाची नोट

मुंबई - लग्न सराई सुरू असल्याने एक रुपयाच्या नोटेशी संबंधित किस्से सर्वांनी आठवत असतील. शगुन देण्यासाठी आता एक रुपयाचे नाणे उपलब्ध आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एक रुपयाची नोट शोधत फिरत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? हीच एक रुपयांची नोट आज १०० वर्षांची होत आहे. चांदीच्या एक रुपयाच्या नाण्याच्या जागी ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ही एक रुपयांची नोट चलनात आली. त्यावेळी प्रथम जागतिक महायुद्ध सुरू होते व देशावर इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी चांदीचा एक रुपया चलनात होता. परंतु युद्ध सुरू असल्याने सरकार चांदीची नाणी पुरवण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे ३० नोव्हेंबर १९१७ रोजी पहिल्यांदाच एक रुपयांची नोट लोकांसमोर आली.  हाताने निर्माण केलेल्या कागदावर छापलेल्या या नोटेवर उजवीकडे ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचमचा फोटो छापला होता. त्याचबरोबर त्यावेळच तीन वित्त सचिव एमएमएस गुब्बे, एसी मॅकवाटर्स आणि एच. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.