रॉयल एनफील्डच्या 650 सीसीचं दोन शानदार बाईक

रॉयल एनफील्डच्या 650 सीसीचं दोन शानदार बाईक

इटलीच्या मिलानमध्ये 7 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या EICMA मोटार शोमध्ये अखेर रॉयल एनफील्डने दोन दमदार बाईकवरुन पडदा उठवला. या मोटार शोमध्ये रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर आयएनटी 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ट्विन सादर करण्यात आल्या. पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने 650 सीसीचं नवं इंजिन आणलं आहे. या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च केली जाणार आहे. तर 2018 च्या जून-जुलै महिन्यात या बाईक भारतात लॉन्च केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही बाईकचा लूक अतिशय शानदार आहे. या दोन्ही बाईक पाहून इंटरसेप्टर मार्कची आठवण होते. मात्र दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे. नव्या इंजिनाबाबत रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितलं की, “हे दमदार इंजिन 7500 आरपीएमपर्यंत जातं. यामुळे बाईकचा वेग प्रतितास 130 ते 140 किमीपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो.”